सोलापूर – सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा जनजागृती रॅली उत्साहात पार पडली.
चार हुतात्मा चौक ते संगमेश्वर महाविद्यालय पर्यंत क्रीडा जनजागृती घेण्यात आली. या रॅलीत समर्थ स्पोर्टस अकॅडमी, हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय, छत्रपती शिवाजी प्रशाला या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या रॅलीचे उद्घाटन सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव, भारती लिंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या रॅलीत ३८० खेळाडूंनी भाग घेतला.
रॅली यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार, सचिव प्रा. प्रमोद चुंगे, प्रा. राहुल हजारे, डॉ.उज्वल मलजी, मारुती घोडके, विरेश अंगडी , विक्रांत विभुते पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 12