पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे बॅक ऑफ इंडियाची आसपासच्या विस खेडेगावासाठी एकमेव राष्ट्रीयकृत बॅक आहे.याठिकाणी आसपासच्या खेडेगावातुन मोठ्या प्रमाणावर खातेदारांची सतत वर्दळ असते .जुन_ जुलै महीन्यात याठिकाणी असणारे शाखाधिकारी दिपक खटके यांची सांगोला तालुक्यात बदली झाली .त्यांच्या जागी झारखंड रांची येथील प्रितम पवन होरो हे शाखाधिकारी म्हणून रुजु झाले .याठिकाणी खेड्यापाड्यातील अनेक खातेदारांना हिंदी व इंग्लिश बोलता येत नाही .यामुळे त्यांच्याबरोबर बोलताना अनेक खातेदारांना अडचणी येत आहेत. माञ संबंधित शाखाधिकारी हे अकरा ऑगस्ट पासुन रजेवर गेले आहेत. ते अद्यापपर्यंत हजरच झाले नाहीत यामुळे बँकेचे कामकाज अक्षरश फक्त पैसै _ देणे घेणे सुरळीत पणे सुरु आहे .अनेक दिवस सोने तारण सुरु नव्हते गेल्या दोन तिन दिवसापासुन सुरू केले आहे.पण सध्या गेल्या विस दिवसापासुन सर्व प्रकारची कर्ज प्रकरणे व इतर सर्वच प्रकरणे पुर्ण पणे बंदच आहे.शासनाने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली आहे .एक यादी संपली आहे .सध्या दुसरी यादी सुरु आहे.शासनाने कर्ज माफी झालेल्या शेतकऱ्यांना तिसऱ्या दिवशी नव्याने कर्ज देण्याची घोषणा केली आहे.माञ याठिकाणी तयाची अद्यापपर्यंत अमंलबजावणी झालेली दिसत नाही .या अडी अडचणी सोडविणयासाठी व बॅकेचे कामकाज सुरळीपणे सुरु राहणयासाठी याठिकाणी शाखाधिकारयासारखा सक्षम अधिकारी असणे आवश्यक आहे .पण गेल्या विस दिवसापासुन याठिकाणी शाखाधिकारीच नाहीत यामुळे बॅकेची सर्व निर्णय प्रक्रियाच थांबली आहे .एकतर पिलीव गावात आसपासच्या दहा _ पंधरा गावासाठी ही एकमेव राष्ट्रीयकृत बॅक पण याठिकाणी शाखाधिकारी त्यांच्या काहिही अडचणी मग ती घरगुती असो की इतर तब्बल विस दिवस गैरहजर आणी ते अजुन किती दिवस गैरहजर राहणार असा प्रश्न खातेदाराकडुन विचारला जात आहे .याबाबत सोलापूर येथील झोनल ऑफीसर कडे वारंवार तक्रार करुनही प्रभारी शाखाधिकारी सुदधा नेमला नाही . चौकट _ पिलीव येथील बॅक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी गेल्या विस दिवसापासुन रजेवर आहेत. यामुळे कामकाज ठप्प झाले आहे .याबाबत सोलापूर येथील झोनल ऑफीसर यांचयाकडे तिन _ चार वेळा तक्रार करुनही कोणीही दखल घेतली नाही. _ संजय पाटील, खातेदार बॅक ऑफ इंडिया . चौकट _ येथील शाखाधिकारी गेल्या विस दिवसापासुन रजेवर असल्यामुळे खातेदारांची प्रचंड गैरसोय होत आहे .याबाबत मी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे._ सुजित सातपुते .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















