पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास नामदेव जाधव वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहुन सर्व सामान्ययांना दिलेली आरोग्य सेवा याच त्यांच्या आरोग्य सेवेतील उत्कृष्ट दिलेल्या योगदानाची मराठी न्युज व धाडस टाइम्स 24 यांच्यावतीने डाॅकटर विलास नामदेव जाधव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श डाॅकटर जीवनगौरव पुरस्कार 2026 ने त्यांना माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते ,बाळासाहेब सरगर, संपादक सचिन रणदिवे ,संपादक महेश मोहीते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो _ पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना सन्मानित करताना माजी आमदार रामभाऊ सातपुते व इतर मान्यवर.




















