सोलापूर : दि.०२/०९/२०२६ रोजी पद्मशाली शिक्षण संस्था संचालित नारायणराव कुचन प्राथमिक शाळेची स्थापना १९५९ मध्ये झाली. सोलापूर शहरात काही प्राथमिक शाळा बंद पडल्या होत्या. तेंव्हा पद्मशाली शिक्षण संस्थेने प्राथमिक शाळा सुरु करावी, असा सल्ला सोलापूर नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती माधवराव कोंतम यांनी संस्थेचे कै. श्री. गंगाधरपंत कुचन यांना दिली. संस्थेने पद्मशाली बिल्डिग मध्ये पद्मशाली शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा या नावाने शाळा सुरु केली. नंतर कुचन परिवाराकडून भरीव देणगी दिली व नारायणराव कुचन प्राथमिक शाळा असे नाव देण्यात आले व तसेच भूदेवीबाई कटकम बालक मंदिरासाठी कै. शंकरराव कटकम यांनी दिलेल्या देणगीतून पत्नीच्या नावाने शाळा सुरु केली. या शाळा ज्या इमारतीमध्ये भरायची ती म्हणजे पद्मशाली बिल्डिग, तत्पूर्वी वाचनालय, रात्रशाळा, तेलुगु शाळा इत्यादी संस्थेच्या इमारतीमध्ये चालत होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्याने शाळेसाठी इमारत बांधायचे ठरले. तेंव्हा संस्थेकडील निधी कमी पडत असल्याने संस्थेचे अध्यक्ष कै. विठोबा वड्डेपल्ली यांनी स्वखर्चातून शाळेची इमारत बांधून संस्थेला अर्पण केली होती. तसेच कै. सिद्रामप्पा चिन्नप्पा सारंगी यांनीही आपल्या वडिलांच्या कै, चिन्नप्पा यल्लप्पा सारंगी स्मरणार्थ शाळेसाठी इमारत बांधून दिली.
आज पद्मशाली बिल्डिगला १०९ वर्षे पूर्ण झाली. संस्थेने या शाळेसाठी नवीन वास्तू संकुल बांधण्याचा विचार केला आणि बुधवार दि.०२/०९/२०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या भूमिपूजन कार्यक्रम बालाजी अमाईन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. डी. राम रेड्डी यांच्या शुभहस्ते व मा. महापौर श्री. विनायक कोंडयाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी महापौर विनायक कॉडयाल सदर भूमिपूजन कार्यक्रमास सपत्नीक उपस्थित राहिले. उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे सचिव श्री. दशरथ गोप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
मा. श्री. राम रेड्डी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचा, उपक्रमांना दाद देऊन ज्या पूर्वजांनी हि वास्तू बांधून दिली त्यांना धन्यवाद देऊन समाज सदैव त्यांचा ऋणी राहिल. नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण होवो यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे व्यक्त केले.
मा. महापौर श्री. विनायक कोंडयाल यांनी आपल्या मनोगतातून आपल्या समाजाचे पूर्वज कै. विठोबा बड्डेपल्ली व के. सिद्रामप्पा सारंगी यांच्या कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो. ज्यांनी इमारत बांधून दिली. त्यांची संस्थेने त्यांचे कार्य, आठवणी जतन करावे, त्यांची ओळख ठेवावी, त्यामुळे भविष्यात तरुण पिढीला याची माहिती होईल, अशी ईच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमास पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जून सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, दिनेश यन्नम, पांडुरंग दिड्डी, नागनाथ गंजी, व्यंकटेश आकेन, श्रीधर चिटयाल, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, सौ. संगीता इंदापुरे, प्रभाकर आरकाल, नागनाथ श्रीरामदास, गणेश गुज्जा, नरेश श्रीराम, श्रीनिवास जोग, हरिष कोंडा, दत्तात्रय यन्नम, श्रीनिवास अं. गड्डम, रामदास इप्पाकायल, अरविंद कुचन, श्रीनिवास इप्पाकायल, निलेश सरगम, ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, मुरलीधर आरकाल, रामचंद्र जन्नू, अशोक इंदापुरे, संतोष सोमा, इंदिरा कुडक्याल, अॅड, शैलजा क्यातम, रमेश विडप, सुलोचना गुंडू, ज्ञानेश्वर म्याकल, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, मल्लिकार्जुन कमटम, पेंटप्पा गड्डम, शेखर इगे,वड्डेपल्ली परिवार, सारंगी परिवार, आनंद चिन्नी, अमृतदत्त चिन्नी, दत्तू बंदपट्टे, राजण्णा भंडारी, रमेश कैरमकोंडा, सुरेश श्रीराम, यशवंत इंदापुरे, मोहन कुचन व परिवार, दयानंद कोंडाबत्तीनी, राजू सोमा, संतोष सांजेकर, अॅड. श्रीनिवास कटकूर, अॅड. हेमंत साका, अॅड. मनोज पामूल, सुधाकर बुर्मूल, राम गड्डम, चक्रधर अन्नलदास, राकेश पुंजाल, श्रीनिवास वा. गड्डम, अंबादास बिंगी, दत्तात्रय बडगू, विश्वनाथ मेरगू तसेच मुख्याध्यापक पुलकेशी संगा व संस्था संचालित शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच नारायणराव कुचन प्राथमिक शाळा व भूदेवीबाई कटकम बालक मंदिरचे सर्व शिक्षक उपस्थित होते.




















