पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात पावसाळा सुरु होऊन तिन महीने झाले तरीही अद्यापपर्यंत पाऊसच पडला नाही .यामुळे सध्या भिषण दुष्काळाचे सावट उभे आहे .पिलीव कडील पश्चिम भाग, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी यासह पश्चिम भागातील सर्वच गावावर सध्या पाणीच नाही .विहीरींनी तळ गाठला आहे ,शेतातील पिके जळुन चालली आहे .जनावरांना चारा नाही .पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर आहे .एकीकडे शेतकरी भिषण दुष्काळाचा सामना करीत आहे .काही शेतकऱ्यांच्या विहीरीत थोडेफार पाणी आहे पण तेच पाणी पिकाला देणयासाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी किंवा जनावरांसाठी पाणी असो या भागात सध्या या भिषण परिस्थीतीत सुद्धा महावितरणकडून इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली लोडशेडिंग केले जात आहे .यामुळे शेतकरी अक्षरश हतबल झाला आहे .एकतर पाऊस पाणी नाही ,भिषण दुष्काळाचे संकट या भागातील ओढे, नाले ,तळी ,बंधारे अद्यापही कोरडेच आहेत आणी वरुन महावितरणचा लोडशेडिंगचा दणका यामुळे शेतकरी अक्षरश हवालदिल झाला आहे .शासनाने एकतर शेतीपंपाला मोफत आठ तास विज देण्याचे आश्वासन दिले खरेपण ग्रामीण भागात विजच नाही अशी परिसथीती अहे .मग शासनाने दिलेल्या मोफत विजेचा आम्हाला काय उपयोग असा प्रश्न शेतकऱ्यांमधुन विचारला जात आहे .सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी यासह इतर भागात विहीरीत पाणीच नाही मग लोडशेडिंग करुन काय फायदा .एकतर या भागातील मोटारीच सुरु नाहीत मग विजेचा वापर नसूनही लोडशेडिंग कशासाठी असा प्रश्न येथील शेतकऱ्यांमधुन विचारला जात आहे.पिलीव परीसरात वारंवार विज गायबच होत आहे आठ तासातील अगदीच चार ताससुदधा शेती पंपाचा वीजपुरवठा अखंडितपणे सुरु राहत नाही .मग शासनाने शेतकऱ्यांना मोफत दिलेल्या विजेचा काय उपयोग? पिलीव येथील महावितरणकडून वारंवार इमर्जन्सी लोडशेडिंग असे मेसेज येतात तर वेळापुरहुन सप्लाय गेला आहे अश्या मेसेजने पिलीव परीसरातील शेतकरी ञस्त आहेत. पिलीव परीसरातील कॅनालखालील झिंजेवस्ती, कुसमोड भागात पाणी आहे पण विजच नसल्यामुळे पिके जळुन चालली आहेत. पिलीव परीसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. चौकट _ पिलीव परिसरावर सध्या भिषण दुष्काळाचे सावट आहे .यामध्ये थोडेफार पाणी आहे तिथे विजच नाही अशी विदारक परिस्थिती आहे .यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. _ विक्रम सुळे ,शेतकरी सुळेवाडी. चौकट _ याबाबत पिलीव महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडुन याबाबत अधिक माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला माञ त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















