श्रीपूर येथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची खंडकर्यांना देवून सुमारे चार हजार एकर जागा उपलब्ध आहे तसेच अगदी जवळून भिमा नदी वाहते त्यामुळे एमआयडीसी साठी अत्यवश्यक असणारे पाणी उपलब्ध आहे याबरोबरच याला लागूनच संगम ते वेळापूर क्रॉक्रीट रस्ता होत आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे ३ ते ४ किमी वरून सोलापूर ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे . एकूणच पाणी व दळणवळणाची साधने उपलब्ध असलेने व खुद्द पालकमंत्र्यानीच
आश्वासन दिल्याने एमआयडी बाबत श्रीपूरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .
याभागात एमआयडीसी व्हावी यासाठी विद्यमान माळशिरसचे आ . उत्तमराव जानकर , माढ्याचे आ. अभिजित पाटील, माळशिरसचे माजी आ. रामभाऊ सातपुते यांनी पाठपुरावा केला . त्या प्रमाणे सोलापूर औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड यांनी शेती महामंडळाचे जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी भानुदास सालगुडे, सोमनाथ वाघमोडे, शिवसेना (शिन्दे गट ) चे तानाजी भोळे – पाटील,श्रीपूर नगरपंचायतीचे सदस्य तानाजी भगत, सोमनाथ मुंडकणे व उद्योजक महावीर शहा उपस्थित होते .






















