श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे
ऋतिक आगरकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम पार पडला. त्यांनी राज्य कर निरीक्षक राज्यात प्रथम क्रमांक, सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यात प्रथम आणि दुय्यम निबंधक राज्यात दुसरा क्रमांकाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक गुंड हे होते.
प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा जे. पी. गायकवाड यांनी मांडले. त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचा हेतू सांगितला. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते.
प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. जळकुटे जे. बी. यांनी करुन दिला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्तीपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हजरत फकीर, कु. वैभवी डांगे, कु. सुदीक्षा कावरे, चेतन चौधरी, राजन लंबे, कु. भाग्यश्री सुतार यांनी मनोगतात आपल्या यशात अध्यापक विद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे असे सांगितले.
प्रमुख पाहुणे आगरकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करुन या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी स्वप्न तसे पाहणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या अभ्यासाची योग्य वेळ निवडावी. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी अभ्यासक्रमाची माहिती घेणे, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील कोणत्याही क्लास शिवाय यश मिळवू शकतो त्यासाठी आपला पाया हा पक्का असणे आवश्यक आहे यश नक्की मिळते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. दीपक गुंड सर यांनी अशा कार्यक्रमाची परंपरा या अध्यापक विद्यालयाने टिकवून ठेवली आहे त्यामुळेच यशाचा आलेख हा उंचावत आहे.
आभार प्रा. जगदाळे विजय यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा जे. पी. गायकवाड यांनी केले.
Post Views: 9