बार्शी – मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशवंतांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम बार्शी येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकुमार बापू शितोळे होते. यावेळी व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष मोळवणे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गाढवे, नगरसेवक प्रकाश माने, ॲड.अनिल पाटील, अशोक सावळे, शिवाजी घोरपडे, सुवर्णा शिवपुरे, रावसाहेब यादव, प्रकाश दहीहांडे, महेश देशमुख, विजय राऊत, माधव देशमुख, गणेश पाटील, राहुल तावरे, गणेश गोडसे आदी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संतोष मोळवणे यांना दलित महासंघाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल
शहर व तालुका यांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला असून, या सत्कारामुळे संघाच्या कार्याला अधिक बळ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रा. किरण गाढवे यांनी प्रास्ताविकात मराठा सेवा संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यानंतर राहुल शिंदे, अशोक सावळे आणि शिवाजी घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक
आणि आर्थिक प्रगतीसाठी संघाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शितोळे यांनी मराठा सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची संघाची भूमिका आदर्श असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते नाना नाईकनवरे यांनी वाचनालयास एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
Post Views: 30