मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

पिलीव – माळशिरस तालुक्यातील मळोली येथे पिलीव एस्केपमधुन तब्बल चौदा वर्षांनंतर माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे भरुन घेतलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन आज त्याच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.पिलीव येथील असणारा मुख्य एस्केप नंबर 11 साखळी क्रमांक 138/650 मधुन सोडण्यात येणारे पाणी जवळपास चौदा वर्षांपासून बंद होता .या एस्केपमधुन पाणी झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली ,शेंडेचिच या चार गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्यासाठी उपयोग होतो .माञ एस्केप बंद असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती .सध्या तर भिषण दुष्काळी परिस्थिती आहे .या परिस्थितीत चार गावातील शेती अडचणीत आले होते .याबाबत पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव यांनी याबाबत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे कैफियत मांडली. आमदारांनी याबाबत जाहीर सभेत शब्द दिला होता .याबाबत त्यांनी थेट मंञालयात संबंधित खात्याचे मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन ज्या काही याबाबत च्या अडचणी होत्या त्या संपवून कायदेशीर मार्गाने याला मंजुरी मिळविली .यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले .अखेर 24 ऑगस्ट रोजी या एस्केपमधुन पाणी सोडण्यात आले यामुळे पिलीव ते शेंडेचिच पर्यंतचे 8 ते 9 बंधारे या पाण्याने भरुन घेतले .यामुळे चार गावातील शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला .यानिमित्त मळोली येथील ओढयावरील पाण्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत जलपुजन करण्यात आले .यावेळी पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहीते ,उपाध्यक्ष शशांक जाधव, पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे, पिलीव भाजपचे शहराध्यक्ष प्रमोद भैस, प्रभाकर आवताडे, रोहीत आवताडे, काळमवाडीचे बंडु जाधव, अमर भैय्या देशमुख, मदन देशमुख, पिनु येडगे, महेश काळे, माजी सरपंच तुषार लवटे, महादेव काळेल, रामभाऊ गोरड, अंकुश भैस यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती कुसमोड, मळोली ,शेंडेचिच भागातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी या एस्केपमधुन पाणी सोडल्याबद्दल चार गावातील   शेतकऱ्यांच्या  वतीने  माजी आमदार रामभाऊ सातपुते व जिल्ह्य परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला .तसेच तसेच मळोली येथील प्रमोद जगताप यांची डिवाय एसपी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.                       फोटो – मळोली येथे पाण्याचे जलपुजन करताना माजी आमदार रामभाऊ सातपुते, जि प सदस्य चंद्रकांत जाधव, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, पंचायत समिती सदस्य शिवराज पुकळे, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते व इतर मान्यवर.
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!