सोलापूर- सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध परवान्यासाठी एक खिडकी योजनेअंतर्गत परवाना देण्याचा शुभारंभ मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालय येथे ट्रस्टी अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
या परवान्यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड अध्यक्षांचा फोटो घेऊन येण्याचे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी केले. सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवाना काढून देण्याचे काम करण्यात येणार असून यात पूर्ण वेळ कार्यालयात मल्लिनाथ याळगी 9730872087 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्ट अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी सोलापूर शहरातील गणेश उत्सव मंडळांना केले आहे.
सदर प्रसंगी ट्रस्टी कार्यालय चिटणीस मल्लिनाथ याळगी, गणेश चिंचोळी, दिलीप पाटील, संतोष खंडेराव,बसवराज वाले, तुषार सिताप यांच्यासह मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.





















