Wednesday, October 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

तरुण भारतbyतरुण भारत
September 4, 2026
in solapur
0
शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

     सोलापूर : बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेली २५ वर्षे राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या धडक कारवाईचे स्वागत केले आहे; मात्र केवळ वास्तू सील करून हा विषय संपत नसून, हिंदू आरक्षणाचा लाभ घेऊन राज्य शासनाची घोर फसवणूक करणारा आणि या धर्मांतर रॅकेटचा मुख्य सूत्रधार ख्रिश्चन पास्टर दत्तात्रय कानेपागूल उर्फ येहान मार्क याला बेड्या कधी ठोकणार, असा खडा सवाल हिंदु संघटनांनी प्रशासनाला विचारला आहे. आज सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही संतप्त मागणी करण्यात आली.

     सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेतला श्री. रवी गोणे (शहर अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना), श्री. आनंद मुसळे (शहर संघटक, हिंदु राष्ट्र सेना), श्री. प्रकाश आसादे (हिंदु राष्ट्र सेना), श्री. राजन बुणगे (सोलापूर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती), कु. वर्षा जेवळे (सोलापूर, हिंदु जनजागृती समिती) आणि अधिवक्ता चंद्रशेखर वारद (राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती) हे उपस्थित होते.

     दत्तात्रय कानेपागूल हा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कारकून म्हणून कार्यरत आहे. त्याने ‘हिंदू मोची’ या जातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी लाटली. मात्र, प्रत्यक्षात ख्रिश्चन धर्म स्वीकारून तो ‘येहान मार्क’ या नावाने ‘जिजस गॉस्पल सोसायटी’ या चर्चचा पास्टर म्हणून धर्मांतराचे उद्योग चालवत आहे. हा प्रकार म्हणजे केवळ राज्य शासनाचीच नव्हे, तर खऱ्या मागासवर्गीयांच्या हक्कांची घोर फसवणूक आहे. त्यामुळे या बोगस कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून कायमचे बडतर्फ करावे; तसेच त्याने आतापर्यंत लाटलेला पगार आणि सर्व शासकीय सवलती त्याच्याकडून चक्रवाढ व्याजासह वसूल कराव्यात, अशी भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

     कारवाईची कुणकुण लागताच या मंडळींनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी रातोरात चर्चवरील क्रॉस काढून पुरावा नष्ट करण्याचा दांभिक प्रकार केला आहे. शासकीय वास्तूचा बेकायदेशीर वापर करण्यासोबतच, कानेपागूल याने तिथे ध्वनिक्षेपक लावून हिंदू देवी-देवतांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिंगलटवाळी केली. यामुळे परिसरात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली. भोळ्याभाबड्या गरीब हिंदूंची फसवणूक करण्यात आली. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत प्रशासनाने त्याच्यावर आणि ‘जिजस गॉस्पल सोसायटी’च्या पदाधिकाऱ्यांवर माहिती लपवणे, पुरावा नष्ट करणे यासह नवीन ‘भारतीय न्याय संहिता’, ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणि ‘अनुसूचित जाती पडताळणी कायद्या’नुसार तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच, भाडेकरारातील अटींचा उघडभंग केल्याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी ‘जिजस गॉस्पल सोसायटी’ची (नोंदणी क्र.: F-15287) ट्रस्ट मान्यता तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

     भोळ्या आणि गरीब हिंदूंना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणाऱ्या या मोठ्या षडयंत्रामागे नेमके कोण आहे आणि यासाठी पैसा कुठून येत आहे, याची राज्य शासनाने सखोल चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच राज्यभरात इतरत्र कुठेही समाजमंदिरांचा असा गैरवापर होत असल्यास त्याचीही तातडीने चौकशी व्हावी. प्रशासनाने पास्टर दत्तात्रय कानेपागूल याला पाठीशी न घालता तात्काळ अटक करावी, अन्यथा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या वेळी देण्यात आला.

Post Views: 93
Previous Post

धोंडप्पा रुपनुरे यांना ड्रीम फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कुर्डूच्या शाळा-क्रीडा संकुलाचा प्रस्ताव कागदोपत्रीच!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कुर्डूच्या शाळा-क्रीडा संकुलाचा प्रस्ताव कागदोपत्रीच!

ताज्या बातम्या

पूर्व विभागात साजरा झाला ब्रतकुम्मा संबंरालू उत्सव

October 21, 2026

शिस्त, संघभावना अन् राष्ट्रभक्ती! सोलापुरात RSS चे विजयादशमी संचलन

October 21, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 20, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 20, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले होटगी मठात जगद्गुरूंचे आशीर्वाद!

October 20, 2026

विजयादशमीला श्री दुर्गामाता दौडीने सोलापुरात भक्तीचा जागर

October 20, 2026
शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेत 6 पदके

शहरस्तरीय मैदानी स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेत 6 पदके

October 20, 2026
घरोघरी अक्काताई हव्याच : पुरुषोत्तम खेडेकर‘अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

घरोघरी अक्काताई हव्याच : पुरुषोत्तम खेडेकर‘अक्काताई : जीवनकार्याची सुवर्णगाथा’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

October 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1387701

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!