सोलापूर : शिक्षक दिनानिम्मित शैक्षणिक उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाबद्दल ड्रीम फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय व राजस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे . सर्व निवड झालेल्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी डॉ अशोक नगरकर विनायक कोंडयाल महापौर सोलापूर प.पू . महातेंश स्वामीजी माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार- पाटील काशिनाथ भतगुणकी संगीता भतगुणकी रमेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री सिद्धेश्वर कृषी पर्यटन केंद्र सोरेगाव येथील कुमठे सोरेगाव रोड- लगत मानूर वस्ती विजापूर रोड सोलापूर येथे हे कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे माहिती ड्रिम फाउंडेशन सोलापूर तर्फे कळविण्यात आले असल्याचे माहिती संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले या कार्यक्रमास नागरिकांनी व पुरस्कार प्राप्त बंधू भगिनी यांनी वेळेवर उपस्थित राहून शोभा आणावी .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















