सोलापूर – कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या एका गरजू शिक्षकाला मदतीचा हात देण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूरच्या वतीने एक लाख पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश नुकताच सुपूर्द करण्यात आला.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे सर आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अवचिल महाडिक यांच्या हस्ते कर्करोग ग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, शहर प्रमुख पवन कांबळे, जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष श्रीरंग बनसोडे , सचिव बाबुराव गायकवाड आणि जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण बनसोडे आदी उपस्थित होते.


















