सोलापूर – सेंट थॉमस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहर, राज्य आणि झोन स्केटिंग तसेच योगासन स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादन करत ८ पदके पटकावली.
शहरस्तरीय योगासन स्पर्धेत गार्गी आळगीकर हिने आर्टिस्टिक पेयर गटात प्रथम क्रमांक मिळवला, तर राज्यस्तरीय स्पर्धेत ती द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. याशिवाय आयसीएसई बोर्डाच्या पुणे झोन स्केटिंग स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, क्रीडा शिक्षक अमित येवलेकर, राजेंद्र गायकवाड, प्रशांत जाधव तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते असे:
- शिवाने हत्ते (११ वर्षाखालील गट): इनलाईन ट्रॅक ५०० मीटरमध्ये द्वितीय आणि इनलाईन ट्रॅक १००० मीटरमध्ये तृतीय.
- शिवम वाघमोडे (१४ वर्षाखालील मुले ): इनलाईन ट्रॅक ५०० मीटरमध्ये द्वितीय आणि इनलाईन ट्रॅक १००० मीटरमध्ये तृतीय.
- श्रवण पेरला (१४ वर्षाखालील मुले ): क्वाड्र स्केटिंग १००० मीटरमध्ये प्रथम आणि ५०० मीटरमध्ये द्वितीय. तसेच रीजनल आयसीएसई बोर्ड स्पर्धेसाठी त्याची निवड.





















