सांगोला – क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक राजे उमाजी नाईक यांच्या २३५ व्या जयंती निमित्त सांगोला महाविद्यालयात विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालाचे प्राचार्य चारुदत्त जगताप यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील सुरवातीचे भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी परकीय राजवट ही अन्यायकारक व अत्याचारी असते म्हणून ब्रिटीश सत्तेविरुद्ध बंड केल्याचे सांगितले. त्याचबरोबर आजच्या काळात राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचे आचरण सर्वांनी करावे असे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.कार्यालयीन अधीक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती, पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी शंकर माने, बापू इंगोले यांनी परिश्रम घेतले. यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालाचे प्रा.डॉ.एन.डी.बंडगर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 7