सोलापूर – महाराष्ट्र राज्य 45 वी सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धा 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान चंद्रपूर येथील क्रीडा संकुल या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता जवाहरलाल शेतकी हायस्कूल मंगळवेढा या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित रहावे. या निवडचाचणी समितीमध्ये सोलापूर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन संघटनेचे सचिव राजेंद्र माने, शब्बीर शेख व शिवकुमार स्वामी हे काम पाहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भुतडा यांनी केले आहे.
——–
Post Views: 12