अकलुज – येथील महाशिवरात्र यात्रा समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्या वतीने पवित्र श्रावण मासाच्या समाप्ती शेवटच्या सोमवारी सायंकाळी शंकरनगर येथील श्री शिवपार्वती मंदिरात महाआरती चे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने खासदार धैर्यशील मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी सौ शितल देवी मोहिते पाटील या उभयतांच्या हस्ते शिवपार्वतीस लघुरुद्राभिषेक व एक लक्ष बिल्वापत्र अर्पण करण्यात आले मंदिराचे पुजारी प्रसाद कुलकर्णी व त्यांचे सहकार्यांनी लवरुद्राभिषेक पूजा सांगितली नंतर महाआरती सुरुवात झाली यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील महाशिवरात्र यात्रा समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील त्यांच्या पत्नी सुलक्षणादेवी मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील त्यांच्या पत्नी कांचन मला देवी मोहिते पाटील कारखान्याच्या संचालिका स्वरूप राणी मोहिते पाटील यांच्यासह परिवार परिवारातील सदस्य व कारखान्याचे व परिसरातील सहकारी संस्थांचे अधिकारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने हजर राहिले होते प्रथम मंदिरासमोरील दीपमाला स्वरूप राणी मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रचलित करण्यात आली तर नंतर वाद्यांच्या गजरात महारती सुरुवात झाली
श्रावण महिन्याभर नामजप, शिवलीला अमृत ग्रंथवाचन, हरिपाठ, प्रत्येक सोमवार लघुरुद्र अभिषेक आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दररोज विविध फुलांच्या रास केली जात होती नागपंचमी सणानिमित्त पर्वती मंदिरावर दोन दिवस सांस्कृतिक वारसा असणा-या विविध पारंपारिक खेळ व उपक्रमाचे आयोजन केलेले होते. यामध्ये हजारो महिला, मुली पारंपारिक वेशभूषेत सहभागी होवून खेळाचा आनंद लुटला . नंतर हर हर महादेवा पार्वती शंकर सदाशिवा हा नाम जप होऊन प्रसाद वाटप करण्यात आले तसेच शोभेची दारु कामाचे सुंदर देखावे व तोफा उडवण्यात आल्या
Post Views: 7