बार्शी – लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल गेल्या दोन महिन्यांपासून बार्शीतील नागरिकांसाठी आरोग्याच्या बाबतीत दर महिन्याला वेगवेगळे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहेत.
त्याच धर्तीवर दि. ७ सप्टेंबर रोजी बार्शी ग्रामीण व बार्शी शहर पोलीस दलातील परिवाराचे व पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. हिरेमठ हॉस्पिटल येथे लायन्स क्लबने आयोजित केले होते. या शिबिरासाठी हिरेमठ हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांनी Lipid profile, HB A1c, BP, Sugar इत्यादी तपासण्या अगदी मोफत करुन औषधाचे पण मार्गदर्शन केले.
या तपासणी शिबिराला बार्शी शहर व ग्रामीण पोलीस व त्यांच्या परिवाराचे ९२ लोकांनी याचा लाभ घेतला. या शिबिरासाठी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार, सहा. पोलीस निरीक्षक सुनील धनवे, एपीआय प्रदीप झाल्टे, एपीआय माकणे, एपीआय समीर ढोरे, एपीआय अक्षय सोनवणे तसेच पोलीस दलातील ज्युनियर ऑफिसर उपस्थित होते. या उपक्रमासाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून ला. डॉ.
स्नेहल माढेकर यांनी जबाबदारीने काम पाहिले. या शिबिरासाठी क्लबमधून ला. डॉ. निनाद माढेकर, ला. राहुल दोशी, ला. मनीष रुगले, ला. खजिनदार उमेश जाधव, ला. वैष्णवी जाधव, ला. ज्योती रेवडकर उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. राजेश खाडे यांनी मोलाचे सहकार्य केले. उ लायन्स क्लबचा हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. लायन्स क्लब बार्शी रॉयल व हिरेमठ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहे.
Post Views: 15