सोलापूर – हा सण प्रामुख्याने श्रावण अमावस्याच्या पिठोरी अमावस्या साजरा केला जातो. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात बैलांसाठी महत्वाचा मानला जातो. गावोगावी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्वी बैलपोळा सण नैसर्गिक पद्धतीने साजरा केला जायचा पण काळाच्या ओघात बैलपोळा साजरा करण्याची पद्धत बदलत गेली. बैल सुंदर दिसण्यासाठी त्यांची शिंगे तासने, शिंगाणा आणि शरीरावर रासायनिक रंग लावणे त्यांना डॉल्बी समोर मिरवणुकीत तासनतास उभा करणे या सर्व चुकीच्या पद्धती मुळे बैलांना वेळवेगळे त्रास आणि आजार होतात ते टाळण्यासाठी ॲनिमल राहत ने बैलांच्या मालकाना आव्हान केली आहेत.
१.बैलांना सजवताना किंवा उत्सव साजरा करताना त्यांना शारीरिक त्रास होऊ देऊ नका.
२.शिंगे तासुन नका, रासायनिक रंग लावू नका.
३.बैलांना सजवण्यासाठी शरीरावर रासायनिक रंग लावू नका.
४.जबरदस्तीने मोठ्या आवाजात डॉल्बी-डीजे समोर उभा करू नका.
हे सर्व प्रकार बैलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत घातक आहेत.वरील सर्व प्रकार बैलांन सोबत केल्यामुळे त्याच्या डोळ्यातून वारंवार पाणी येणे,डोळ्यांचा आणि शिंगाचा कर्क रोग होऊ शकतो म्हणून असे आजार आणि बैलांना होणारा त्रास टाळण्यासाठी संस्थेच्या वतीने कारवानी साजरा कसा करावा हे सांगण्यात 10आले आहे.
१.शिंगे तासु नका त्याऐवजी रंगीत रेबिन वापरा.
२.बैलांना रासायनिक रंग न लावता नैसर्गिक फुलांनी सजवा
३.डॉल्बी च्या मोठ्या आवाजा समोर उभे करणे टाळा.
४.बैलांना जबरदस्तीने नाचवू नका.
५.शांत वातावरणात उत्सव साजरा करा.
६.महत्वाचे म्हणजे त्यांना भरपूर आराम द्या.
७.पुरेसा आहार व पाणी उपलब्ध करून द्या.
८.वेसण ऐवजी म्होरकी वापरा.
९.दोन दाव्या ऐवजी एक दाव वापरा.
१०.बैल आणि इतर जनावरांना दररोज खरारा करा.
ॲनिमल राहत चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांनी बैलपोळा सण बैलांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या बाबत कृतज्ञता’ ‘आभार’ व्यक्त करण्यासाठी असतो, बैलांना अनैसर्गिक शिक्षा करण्यासाठी नसतो त्यामुळे बैल पोळा साजरा करताना बैलांवर अन्याय होणार नाही असा साजरा करण्याचे आवाहन केले आहे.





















