पंढरपूर – पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची एकुण वार्षिक उलाढाल ६६० कोटी झाली असून त्यामधुन ५.४८ कोटी रुपयांचे उत्पन्न बाजार समितीस प्राप्त झाले असल्याची माहिती कृषी बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी दिली.
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.९) संपन्न झाली. त्यामध्ये बाजार समितीचा लेखाजोखा मांडता सभापती गायवाड बोलत होते. यावेळी सोलापुर जिल्हयाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, बाजार समितीची स्थापना ही शेतकरी बांधवांना न्याय मिळावा या हेतूने झालेली आहे. त्यामुळे हा हेतू बाजार समितीच्या माजी व विद्यमान सभापतींनी चांगले प्रयत्न केल्यामुळे साध्य होत असून बाजार समितीचा कारभार चांगल्या पध्दतीने सुरू आहे. बाजार समितीने बाजार आवारात जास्तीत जास्त शेतीमाल विकी केल्याबद्दल शेतकरी बांधव, जास्तीत जास्त शेतीमालाच्या विक्रीची उलाढाल करणारे व्यापारी यांचा सन्मान केल्याबद्दल बक्षिसपात्र शेतकरी, व्यापाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा देवून बाजार समितीच्या या उपक्रमाचे कौतूक केले.
————————
चौकट : ( जास्तीत जास्त शेतीमाल विकी केलेले शेतकरी )
विक्रमसिंह डोंगरे रा. आढेगाव ता. मोहोळ, प्रशांत पाचफुले रा. यल्लमवाडी ता. मोहोळ, राजाराम भोसले रा. जाधववाडी ता. पंढरपूर. भारत बागल रा. संजय बागल रा. जळोली ता. पंढरपूर. रामचंद्र शिंदे, रा. शेंडेचिंच ता. माळशिरस, जालींदर बनकर, रा. वेळापुर ता. माळशिरस हनुमंत कदम रा.उघडेवाडी ता. माळशिरस, समाधान कोळेकर रा. सोनके ता. पंढरपूर, संदिप पाटील रा. मेंढापुर ता. पंढरपूर चंद्रकांत लवटे रा. खर्डी ता.पंढरपूर, शिवाजी माळी रा.जळोली ता.पंढरपूर. कुंडलिक घाडगे. प्रदिप मोरे रा. चळे ता.पंढरपूर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
——————–
चौकट : ( जास्तीत जास्त शेतीमाल विक्री केलेले आडते )
तुलसी ट्रेडींग कंपनी प्रो. विनीत बाफना, मे. सदाशिव गणपत डोंबे प्रो. सोमनाथ डोंबे, श्रीहरी ट्रेडींग कंपनी प्रो. मुकुंद मर्दा, आशिष ट्रेडींग कंपनी प्रो. संजय मस्के, मे. अतिक शब्बीर बागवान, मे. खलील अहमद हिरालाल बागबान, धनंजय गाडेकर, मालोजी शेंबडे, काळे अँड कंपनी मारूती हरी काळे, मे.सोहम ट्रेडींग कंपनी प्रो.अशोक शिंदे, मे. संजय विष्णु नागणे, मे. रूक्मिणी-पांडुरंग ट्रेडॉग कंपनी प्रो. ओंकार भोसले, मे. सिध्दनाथ ट्रेडींग कंपनी सोमनाथ सप्ताळ, मुजाहिद नजीर अहमद बागवान, मे. बालाजी फुट सेल प्रो. सचिन गंगथडे, मे. अलताफ बागवान, मे. पांडुरंग ट्रेडींग कंपनी प्रो. पांडुरंग खरात, प्रेरणा ट्रेडींग कंपनी प्रो. प्रदिप बागल, श्री विठ्ठल ट्रेडींग कंपनी प्रो. राहुल देवकर, राजकुमार दिपचंद फडे प्रो. अनिलकुमार फडे, मे. सुनिल दत्तात्रय भिंग यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
———————
चौकट : ( जास्तीत जास्त शेतमाल खरेदीदार )
च जास्त शेतमाल खरेदी केल्याबद्दल खरेदीदार मे. कन्हैया ट्रेडींग कंपनी प्रो. मनोज मालु, श्री. मुस्ताक मन्सुर बागवान, मे. एम राउंड श्री. मुस्ताक इम ईब्राहिम बागवान यांचाही सन्मान करण्यांत आला.
—————-
चौकट : ( बाजार समितीची उलाढाल )
विषय वाचन व अहवाल वाचन करताना सचिव कुमार घोडके यांनी बाजार समितीचे सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न रू.५,४८,६८,३९८/- झाले असून एकूण खर्च रू.३,४३,८१,७०३/- इतका वजा जाता सरप्लस / वाढावा रू.२,०४,८६,६९५/- इतका झालेला आहे. बाजार समिती मध्ये बेदाणा शेतीमालाची रु.५०१ कोटी, डाळींब रू.६० कोटी, फळे व भाजीपाला रू.४२ कोटी, भुसार धान्ये रू.२३ कोटी, कांदा रू.२३ कोटी, जनावरे रू.४ कोटी, केळी रू.६ कोटी, वैरण रू.१ कोटी अशी बाजार समितीची एकुण वार्षिक उलाढाल ६६० कोटी रूपये झाल्याची माहिती दिली.
———————
यावेळी बाजार समितीचे उपसभापती राजुबापू गावडे यांनी सर्वांचे स्वागत केले. बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक सोमनाथ डोंबे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रध्दांजलीचा ठराव बाजार समितीचे संचालक तानाजी पवार यांनी मांडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक सचिव गजेंद्र जोशी यांनी केले. संचालक महादेव बागल यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी पांडुरंग परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी, माजी सभापती, उपसभापती तसेच पदाधिकारी, विद्यमान संचालक तसेच शेतकरी, व्यापारी, आडते, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
Post Views: 10