Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

तरुण भारतbyतरुण भारत
September 13, 2026
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टेंभुर्णी – बैलपोळा सणानिमित्त बैलांची मिरवणूक सुरू असताना टेंभुर्णी-पंढरपूर रोडलगत असलेल्या परिते (ता. माढा) येथे गर्दीच्या ठिकाणी रायफलमधून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी विजयसिंह पृथ्वीराज पाटील (रा. परिते, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125 तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 25(9) अन्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी बैलपोळा सणानिमित्त परिते परिसरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी-पंढरपूर रोडलगत असलेल्या परितेवाडी येथील मारुती मंदिराजवळ मिरवणुकीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याचवेळी विजयसिंह पृथ्वीराज पाटील याने स्वतःच्या ताब्यातील रायफलमध्ये राउंड लोड करून ती आकाशाच्या दिशेने पकडत हवेत फायर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गर्दीच्या ठिकाणी रायफलमधून गोळीबार झाल्याने उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सणाच्या उत्साहात अचानक बंदुकीचा आवाज घुमल्याने नागरिकांमध्ये या प्रकाराची चर्चा सुरू झाली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचा वापर करून हवेत गोळीबार केल्याने स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.
बैलपोळा हा शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पारंपरिक महत्त्वाचा सण आहे. बैलांची सजावट, मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर आणि उत्साहाच्या वातावरणात नागरिक सहभागी झाले असताना रायफलच्या गोळीबाराचा प्रकार घडल्याने सणाच्या उत्साहाला वेगळेच वळण मिळाले. ‘पोळ्याचा सण की बंदुकीचा बार?’ असा प्रश्नही या घटनेनंतर नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेवर चर्चा सुरू असताना एका शेतकऱ्याने पोलिसाला विचारले, “साहेब, परितेवाडीत गोळीबाराचा आवाज आला की ओ?” त्यावर पोलीस म्हणाला, “आरं गप की… पोळ्याचा सण हाय ना! मग मोठ्ठा लवंगी फटाका लावला असंल!” हा उपरोधिक संवाद सध्या परिसरातील चर्चेचा विषय ठरत असला तरी प्रत्यक्षात गर्दीच्या ठिकाणी शस्त्रातून गोळीबार होणे हा गंभीर प्रकार असल्याने नागरिकांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून विविध स्तरांवर बैठका घेऊन नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी व संबंधित घटकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात. गणेशोत्सव असो, यात्रा असो किंवा इतर धार्मिक-सामाजिक कार्यक्रम असोत, गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जातात.
मात्र, पोलिसांकडून बैठका घेऊन सूचना दिल्या जात असतानाही काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्थेची पर्वा न करता असे प्रकार करीत असतील, तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. योग्य वेळी योग्य कारवाई झाली, तर अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता कमी होते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोहेकॉ/497 दत्तात्रय महादेव वाघमारे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.21 वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 685/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1575 दशरथ बोबडे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही हेड कॉन्स्टेबल 1675 पंढरीनाथ आरकिले यांनी केली आहे.
सण-उत्सव हे आनंद आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी असतात. अशा कार्यक्रमांमध्ये शस्त्रांचे प्रदर्शन अथवा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यावर वेळीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे “कायद्याचा बार फुसका, पुढाऱ्यांचा बार पक्का” असे म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहून वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Post Views: 23
Previous Post

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

Next Post

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

ताज्या बातम्या

पार्थिव गणेशाची खरी पद्धत सांगतायत पंचांगकर्ते मोहन दाते#solapur

September 13, 2026
विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199375

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!