अक्कलकोट – अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालय आणि अक्कलकोट महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही
संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या मार्गदर्शनाखाली
गणेशोत्सवानिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर ते बुधवार, दि. २३ सप्टेंबर या कालावधीत ही व्याख्यानमाला होणार आहे.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मंगळवारी (दि.१५) सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध भाषण प्रशिक्षक सचिन वायकुळे (बार्शी) यांचे असून, ते ‘गुणवत्तेला कौशल्याची जोड’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या पुष्पात बुधवारी (दि.१६)
प्रसिद्ध वक्ते दत्ता थोरे (सोलापूर) हे ‘समाजसुधारक ज्योतिबा फुले’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
तिसऱ्या पुष्पात
सोमवारी (दि.२१)
उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. सविता दूधभाते (पंढरपूर) यांचे ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
मंगळवारी (दि.२२)
सोलापूरचे प्रवचनकार प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी हे ‘टिळकांच्या गणेशोत्सवातून युवकांना प्रबोधन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच
बुधवारी (दि.२३)
वालचंद महाविद्यालयाचे डॉ. भीमाशंकर बिराजदार (सोलापूर) यांचे ‘हसा आणि हसवा’ या विषयावर विनोदी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेस माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, उपाध्यक्षा भारती खेडगी, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाईस चेअरमन अशोक हारकुड, संचालक अॅड. अनिल मंगरुळे, पवित्रा खेडगी, ज्योती धरणे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कोरे, उपाध्यक्ष डॉ. अशोक माळगे, सचिव दत्तात्रय होटकर व संचालक मंडळ, पालक वर्ग आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये वैचारिक प्रबोधन, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या व्याख्यानमालेचा नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय व पतसंस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
चौकट
*कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा विशेष गौरव*
व्याख्यानमाले दरम्यान महाविद्यालयीन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.