पंढरपूर – गणपती, गौरी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये प्लास्टिकची फुले, हार, सजावटीचे साहित्य आणि देखाव्याच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे. पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिक फुले, हारांच्या विक्रीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. मात्र या प्रकाराकडे पर्यावरण विभाग तसेच नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बरोबरच प्लास्टिक फुले तसेच हारांच्या विक्रीमुळे ऐन सणउत्सवाच्या काळात शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या फुलांना देखील चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडत आहेत.
सध्या गणपती आणि त्यानंतर गौरी-लक्ष्मी उत्सवाला सुरुवात होत असल्याने शहरातील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने फुलल्या आहेत. यामध्ये प्लास्टिकची फुले, प्लास्टिकचे हार, कृत्रिम तोरणे आणि विविध सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत असल्याचे माहीत असतानाही या वस्तूच्या विकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्लास्टिकच्या हार-फुलांबाबत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहेत. त्यामुळे शहरी भागात नगरपालिका आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना असल्याचे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याच समोर आले अह त्यामुळे पयावरण विभागान कारवाईची जबाबदारी झटकली असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
—————-
चौकट : ( शेतकरी वर्गातून प्लास्टीक हार,फुलांवर बंदीची मागणी)
प्लास्टिक फुल, हारांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांनी कष्टकरुन, विज, पाणीचंटाईवर मात करीत फुलविलेल्या फुलांना मात्र चांगला दर मिळत नाही. त्यामुळे प्लास्टिक फुल,हारांच्या विक्रीला ताबडतोब बंदी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून देखील केली जात आहे.
——————
चौकट : ( पर्यावरणाचा संदेश केवळ यात्रेपुरताच का? )
पंढरपूरमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाकडून पर्यावरण पर्यावरणावर संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यावरणाची वारी’सारख्या हाणार उपक्रमातून नागरिकांना पर्यावरण रक्षणावा संदेश दिला जातो. या कार्यक्रमांनध्ये संत-महंतांवी कीर्तने, प्रवचने आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले जाते.
——————
चौकट : ( पालिका कारवाईचा बडगा उगारणार का ?)
शहरातील बाजारपेठांमध्ये प्लास्टिकच्या फुलांचे हार, सजावटीचे साहित्य आणि अन्य प्लास्टिक वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून यावर कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पर्यावरण विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बोट दाखविले जात असेल तर नगरपालिका प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरून कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
——————–
चौकट : ( मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी )
पर्यावरण संवर्धनाबाबत शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी नागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. प्लास्टिकच्या हार-फुलांची विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पर्यावरण विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी ‘जबाबदारी कोणाची?’ या वादात न अडकता संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Post Views: 12