सोलापूर – सद्गुरू श्री सिद्धारूढ स्वामींचे जीवन आणि त्यांचे विचार मानवी समाजाला दिशा देणारे आहेत. आजच्या आधुनिक युगात मनाला शांती आणि जीवनाला सत्कार्याची जोड देण्यासाठी अशा धार्मिक ग्रंथांचे श्रवण करणे अत्यंत गरजेचे आहे. पुराणातील विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आचरणात आणले पाहिजेत, हीच स्वामींची खरी सेवा ठरेल.” असे प्रतिपादन सोलापूर
महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले. यावेळी अरकेरीचे मठाधिपती औदुसिध्द महाराज, मळसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती गुरुसिध्द म्हेत्रे, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, भाजपा नेते गौरीशंकर मेंडगुदले, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, शिवानंद लोभे, दयानंद ख्याडे, सतीश वेर्णेकर, तमन्ना पुजारी, शिलीसिद्ध पुजारी, बाळू पुजारी आदी उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र काळे पुढे म्हणाले की, मळसिद्ध मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी होणाऱ्या अशा आध्यात्मिक सोहळ्यांमुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा मजबूत होतो. ग्रामीण संस्कृती आणि धार्मिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी तरुण पिढीने यात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुराणकार धनंजय महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मलकारसिद्ध मंदिरापासून मुख्य रस्त्यावरून मळसिद्ध देवाच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मळसिध्द मंदिराच्या पटांगणात सिद्धापूरचे ओगसिध्द, कुंभारी चे गेनसिद्ध,मद्रीचे मुत्यप्पा, मंद्रूपचे मल्लिकार्जुन, भंडी मलकारसिद्ध व मळसिध्द या देवाच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. महाप्रसादाने पुराण समाप्ती करण्यात आली .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























