अकलूज – नर्सिंग हे फक्त रुग्णांवर उपचार व काळजी घेण्यापूरती मर्यादित नसून मानवतावादी दृष्टिकोनातून सेवा करणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले संशोधन मानवतावादी दृष्टिकोनातून करीत भाषेचा कोणताही न्यूनगंड न बाळगता आंतरराष्ट्रीय दर्जा दर्जावर काम करणे गरजेचे मत कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स च्या डॉ. वैशाली मोहिते यांनी व्यक्त केले.
शिवरत्न शिक्षण संस्थेच्या विजयसिंह मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात डॉ. वैशाली मोहिते बोलत होत्या. यावेळी अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, नर्सिंग महाविद्यालयाच्या अध्यक्षा इशिता मोहिते पाटील सचिव धर्मराज दगडे श्रीकांत बनकर, राजेभोसले उपप्राचार्य शिवतेज हिरेमठ आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात अर्चना साळवे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी पदवीग्रहण हे शैक्षणिक जीवनातील अंतरिम न मानता जीवनात पुढेही विविध प्रकारच्या संशोधनात उतरावे व नवीन जीवनात प्रवेश करून अभिमानास्पद कार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी एम.एससी नर्सिंगच्या ९ तर बी.एससी नर्सिंग च्या ४० अशा एकूण ४९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये एम. एससी मध्ये राणी शेंडगेस विद्यालयात पहिल्या क्रमांकाचे, काजल घाडगेस दुसर्या तर विशाल वाघमारेस तिसऱ्या क्रमांकाचे पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर बी.एससी नर्सिंगच्या निकिता पाटील हीस विशेष प्राविण्य तर प्राजक्ता वाघमारे, पूजा यादव, श्रेया लोणारे व महादेव चाटे यांना प्राविण्य पदके देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन व आभार प्रा. रंजना कांबळे यांनी मानले.
Post Views: 18