पिलीव – आदयक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकाने आदर्श घ्यावा असे असल्याचे मत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पिलीव येथे बोलताना केले. ते पिलीव येथे आदयक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 235 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते .यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून सर्व समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी समाजाचे नेते दौलतनाना शितोळे यांनी समाजाने भाजपच्या पाठीशी खंभीरपणे उभा राहण्याचे आवाहन केले. यावेळी पिलीव गटाचे जिल्ह्य परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, जाधव साहेब, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे, शहराध्यक्ष प्रमोद भैस, उमेशभाऊ सरवदे,युवा नेते किरणबाबा गायकवाड, अगनीनाथ चव्हाण, नगरसेवक शिंदे, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते, काकासाहेब जाधव, सौरभ बोडरे, सिताराम बोडरे, रोहीत बोडरे, नानासाहेब बोडरे, अंकुश भैस, रणजित भैस, ॲड सत्यजित गलांडे, मेजर जयशिव गलांडे, डॉक्टर निलेश कांबळे, तुषार लवटे, यांच्यासह समाजबांधव या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा आदयक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त युवकांनी जेजुरी येथुन ज्योत आणण्यात आली तसेच सभेप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अश्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान व जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो _ पिलीव येथे आदयक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त बोलताना माजी आमदार रामभाऊ सातपुते व उपस्थित मान्यवर.





















