पंढरपूर – एमपीएसीसी पेपर फुटीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने रविवारी आक्रोश आंदोलन करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य किरणराज घाडगे यांनी दिली.
या आंदोलना संदर्भात माहिती देताना घाडगे यांनी सांगितले की, येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाचा निषेध देखील करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत शासनाच्या परीक्षा संदर्भातील एकुणच कार्यपध्दतीवर टिका केली. या आंदोलनाच्या वेळी एमपीएससीचे सचिव यांच्या तोंडाला काळे फसणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याचे देखील जोरदार समर्थन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य किरणराज घाडगे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागल, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अमोल कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष किरण कचरे, प्रकाश गाजरे, जिल्हा सचिव स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष पंढरपूर विभाग शेखर आटकळे, तालुकाध्यक्ष करकंब विभाग राजेंद्र पवार, पंढरपूर शहराध्यक्ष सत्यम धुमाळ, करकंब शहराध्यक्ष विजय पवा,र तालुका सचिव सोमनाथ कदम, प्रसाद सातपुते, धनंजय मोरे, गोपी वाडदेकर, महेश पवार, अभिजीत भिंगारे,
ओंकार भिंगारे, वैभव यादव, किशोर मोळक, ऋषिकेश रोकडे, विक्रांत बोडके, प्रशांत माळी, विनायक लिंगे, सिद्धांत जाधव,शुभम ताठे देशमुख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले होते.
Post Views: 15