लातूर : लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी गंगासिंह कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली असून, याबाबतचे नियुक्तीपत्र १२ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले.
लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सात कार्यकर्त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तानाजी फुटाणे, गंगासिंह कदम, गोविंद बोराडे, विलासराव पाटील, मारोती पांडे, प्रभाकर बंडगर आणि दत्तोपंत सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
गंगासिंह कदम हे पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय असून, ग्रामीण भागातील कार्यकर्ते व नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गंगासिंह कदम यांच्या निवडीचे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून स्वागत करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे लातूर ग्रामीण काँग्रेस मध्ये संघटनेला नव्या नेतृत्वाची आणि कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नियुक्तीनंतर गंगासिंह कदम यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 6