टेंभुर्णी – येथील झुंझार गणेश मंडळ भोसले वस्ती या मंडळाची वार्षिक मीटिंग 6 सप्टेंबर रोजी भोसले वस्ती येथील गजानन मंदिर येथे पार पडली. या बैठकीत सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी अमीर काजी यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी नागनाथ गायकवाड व मिरवणूक प्रमुख म्हणून गोविंद जगताप यांची निवड करण्यात आली.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भोसले, बाळासाहेब चव्हाण व असिफ काझी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
हे मंडळ नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत असून, अध्यक्षपदी अमीर काजी यांची निवड झाल्याने एक्याचे प्रतीक म्हणून या मंडळाकडे पाहिले जाते.
यावेळी झालेल्या बैठकीसाठी सुनील भोसले, सह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 16