सोलापूर – ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एका सराईत चोरट्याला अटक करून सौरउर्जा प्लांट मधील व नदीकाठावरील मोटारीचे 145 किलो कॉपर वायर (किं. 1 लाख 88 हजार 500 रुपये) हस्तगत केला आहे.
समाधान नवनाथ पवार (वय-21 वर्षे, रा.रानमसले ता. उत्तर सोलापूर)असे अटक करण्यात आलेल्या त्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना जिल्हयामध्ये सौरउर्जा सोलर प्लॉट मधील,व इलेक्ट्रीक पंम्प, पानबुडी मोटार मधील कॉपर वायर चोरींच्या गुन्हयांची उकल करणेकामी आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास इलेक्ट्रीक मोटारीतील कॉपर वायर चोरीच्या गुन्हयांची उकल करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक रानमसले (ता.उतर सोलापूर)गांवात असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि रानमसले येथील राहणारा इसम समाधान पवार याने त्याचे साथिदारासह गौडगाव (ता. बार्शी) येथील सोलर प्लांट मधील व जिल्ह्यातून कॉपर वायरची चोरी केली असून तो सध्या चोरुन आणलेल्या मालाची विक्री करणेकरिता गांवात त्याचे घरासमोर थांबला असल्याची माहिती मिळाली . माहितीप्रमाणे पोलिसांनी सदर आरोपीला घराजवळून जाऊन ताब्यात घेतले. व त्याच्या घराची तपासणी केली असता घरामध्ये प्लॉस्टिकच्या वेवेगळया पोत्यामध्ये भरुन ठेवलेले वायरचे पोते मिळून आले. हे कॉपर वायर त्याने आपल्या मित्रासोबत मागील काही महिन्यापासून उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी( ता. माढा)इत्यादी ठिकाणाहून चोरून रानामध्ये केबल वायर जाळून वेळोवेळी वेगवेगळया पोत्यामध्ये भरुन त्याची विक्री करण्यासाठी ठेवल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी एकूण 6 प्लास्टिक पोती भरलेले तांब्याचे तार जप्त केले. याप्रमाणे वैराग , माढा , टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ. नारायण गोलेकर, धनाजी गाडे, हवलदार नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल, कपिल काटकर, अश्विनी गोटे यांनी पार पाडली आहे.