Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेकडून सराईत चोरट्याला अटक; कॉपर वायर चोरीचे 6 गुन्हे उघडकीस – 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in crime
0
स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेकडून सराईत चोरट्याला अटक; कॉपर वायर चोरीचे 6 गुन्हे उघडकीस – 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने एका सराईत चोरट्याला अटक करून  सौरउर्जा प्लांट मधील व नदीकाठावरील मोटारीचे 145 किलो  कॉपर वायर (किं. 1 लाख 88 हजार 500 रुपये)   हस्तगत केला आहे.
समाधान नवनाथ पवार (वय-21 वर्षे, रा.रानमसले ता. उत्तर सोलापूर)असे अटक करण्यात आलेल्या त्या आरोपीचे नाव आहे.
     पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना  जिल्हयामध्ये सौरउर्जा सोलर प्लॉट मधील,व इलेक्ट्रीक पंम्प, पानबुडी मोटार मधील कॉपर वायर चोरींच्या गुन्हयांची उकल करणेकामी आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास इलेक्ट्रीक मोटारीतील कॉपर वायर चोरीच्या गुन्हयांची उकल करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक  रानमसले (ता.उतर सोलापूर)गांवात असताना  बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि रानमसले  येथील राहणारा इसम  समाधान पवार याने त्याचे साथिदारासह गौडगाव (ता. बार्शी) येथील सोलर प्लांट मधील व जिल्ह्यातून कॉपर वायरची चोरी केली असून तो सध्या चोरुन आणलेल्या मालाची विक्री करणेकरिता  गांवात त्याचे घरासमोर थांबला  असल्याची माहिती मिळाली . माहितीप्रमाणे पोलिसांनी सदर आरोपीला घराजवळून जाऊन ताब्यात घेतले. व त्याच्या घराची तपासणी केली असता   घरामध्ये प्लॉस्टिकच्या वेवेगळया पोत्यामध्ये भरुन ठेवलेले वायरचे पोते मिळून आले. हे कॉपर वायर त्याने आपल्या मित्रासोबत मागील काही महिन्यापासून   उंदरगाव, वडशिंगे, बेंबळे, रांझणी( ता. माढा)इत्यादी ठिकाणाहून चोरून रानामध्ये केबल वायर जाळून वेळोवेळी वेगवेगळया पोत्यामध्ये भरुन त्याची विक्री करण्यासाठी ठेवल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी एकूण 6 प्लास्टिक पोती भरलेले तांब्याचे तार जप्त केले. याप्रमाणे  वैराग , माढा , टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
      सदरची कामगिरी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ. नारायण गोलेकर, धनाजी गाडे, हवलदार नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, कोंडीबा मोरे, अक्षय डोंगरे, सतिष बुरकुल, कपिल काटकर,  अश्विनी गोटे यांनी पार पाडली आहे.
Post Views: 5
Previous Post

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

Next Post

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तर्फे श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207611

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!