पंढरपूर – प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाचे उत्साहात स्वागत करून विधिवत मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभामंडप येथे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्री गणेशाची पूजा-अर्चा करून गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी मंदिर समितीच्या नित्योपचार विभागाचे प्रमुख भीमाशंकर सारवडकर, राजेंद्र सुभेदार तसेच मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 5