सोलापूर : अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या सोलापुरातील १८ अभियंत्यांचा ‘उत्तम अभियंता पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील शिवस्मारक सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य, कार्यक्षमता तसेच शासकीय सेवेत बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची दखल घेऊन या पुरस्कारासाठी अभियंत्यांची निवड करण्यात आली आहे.पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये डॉ. विशाल कांबळे, विजय रुपनर, शेख खालिद अब्दुल हकीम, महेश काळे, धीरज बडडे, प्रदीप मोरे, हेमंत ताकपेरे आणि प्रा. प्रणिती डोके यांचा समावेश आहे.
तसेच निलेश देशमुख, सुमित पिसे, प्रेमसागर कोरे, सागर खरे, सिद्धेश्वर भोसले, राजरत्न रणदिवे, अमर काळे, विश्वास शिंदे, सुजय बागचवरे आणि चंद्रकांत जाधव हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी, अभियंता क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी तसेच मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक आशुतोष नाटकर यांनी केले आहे.
—