सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रेमदास पवार यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार तत्कालीन सरपंचांकडे होता. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रशासक नियुक्त करण्यात येत आहेत. त्यानुसार सुलेर जवळगे ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी प्रेमदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
(टीप मेल वरील फोटो लावणे)
पदभार स्वीकारल्यानंतर प्रेमदास पवार यांचा माजी सरपंच सुरेश अर्जुन, सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले, माजी उपसरपंच नागनाथ पाटील, सुरेश चव्हाण आणि ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नूतन प्रशासक प्रेमदास पवार यांनी प्रशासनाच्या माध्यमातून गावातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले आणि माजी सरपंच सुरेश अर्जुन यांनी गावातील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे सांगत, दुष्काळसदृश्य परिस्थितीत प्रशासक म्हणून प्रेमदास पवार यांनी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी युवा नेते नागराज स्वामी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्रीशैल नाव्ही, लक्ष्मण कोळी, जेट्टेप्पा घोडके, मल्लिकार्जुन कोळी, रमेश कासवीद, अप्पाराव चव्हाण, मोहसीन मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 17