सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,ज्येष्ठ शिक्षक संगप्पा दसगोंडे, शिवशंकर कुंभार, सिद्धाराम कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रजनी माशाळ, गायत्री खराडे, कीर्ती चोळके, गायत्री माशाळ, रत्नकला नागठाण, अलैक्या कोंतम, अर्पणा तुम्मा, प्रतिभा पाटील, जान्हवी कांबळे, अमृता बेनोरे, विराट बागेवाडीकर, श्री दंतुल, अथर्व कोल्हापुरे व शुभम सरवदे आदी विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले.ज्येष्ठ शिक्षक संगप्पा दसगोंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली.ज्येष्ठ शिक्षक संगप्पा दसगोंडे, शिवशंकर कुंभार, सिद्धाराम कुंभार यांनी हिंदी दिवसाची पार्श्वभूमी आणि हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे म्हणाले, हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार अधिक व्यापक होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व जाणून तिच्या संवर्धनासाठी सक्रिय योगदान द्यावे.मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले,हिंदी ही केवळ संवादाचे माध्यम नसून देशातील विविध प्रदेश, संस्कृती आणि समाजघटकांना जोडणारी प्रभावी भाषा आहे. विद्यार्थ्यांनी हिंदीचा अभ्यास केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातही तिचा प्रभावी वापर करावा.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोही काशीद यांनी केले, तर अंजली तावस्कर यांनी आभार मानले.





















