सोलापूर: श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने गणेश उत्सव निमित गणरायांच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमीच्या पहाटे सूर्योदयाच्या प्रहारी मंगलध्वनी व भक्तिमय वातावरण सामूहिक अग्निहोत्र व अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम भव्य दिव्य अशा पद्धतीने संपन्न झाला.
विघ्नाचा नाश करून जीवनात सुख समृद्धी आणणारे गणरायांच्या चरणी समर्पित होऊन अतिशय पवित्र मंत्राचा पाठ करण्यासाठी तब्बल 4000 महिला व पुरुष गणेशभकत भक्ती रसात तल्लीन झाले.
प्रारंभी सोलापूरच्या सूर्योदयचा वेळ ६ वाजून 18 मिनिटांनी पहाटेच्या प्रहारी विश्व फाउंडेशन, शिवपुरी यांच्या वतीने उपस्थितीत भक्तगणानां 4000 अग्निपात्र, गौऱ्या, तुप, काडीपेटी आणि तांदळ देण्यात आली मोहनजी डांगरे, योगेश डांगरे व वक्रतुंड औरंगाबादकर यांनी अग्निहोत्रीची संपूर्ण माहिती भक्तांना सांगितले आणि “सूर्याय स्वाहा.. सुर्याय इंद न मम” मंत्र म्हणत अग्निपात्र प्रज्वलित केले.
तदनंतर पंडित वेणू गोपाल जिल्ला पतूंलू यांच्या पौरोहीत्याखाली अथर्वशीर्ष पठणाला श्री गणेशा करण्यात आली 21 आवर्तन म्हणत पंतलु यांनी विविध मंत्राचा सुद्धा जप करण्यास सांगितले आणिअथर्वशिर्ष मंत्राचा पठण केल्याने मिळणाऱ्या फलश्रुती चा महत्व आपल्या जीवनात,आपल्या कुटुंबासाठी आणि नोकरी, व्यवसायासाठी आध्यात्मिक आणि भौतिक लाभ होईल याचे सविस्तर वर्णन सुद्धा सर्व गणेश भक्तांना सांगितले.
पहाटे चार वाजता अथर्वशीर्ष पठणासाठी प्रथम उपस्थित असलेले कुमारी गौरी हासबे, कुमारी वैष्णवी हासबे, कुमारी आरती गंधमल, कुमारी ऋतुजा कटाप आणि कुंभारी वरून आलेले सौ सुनंदा चेंडके यांच्या शुभहस्ते व भक्त गणाच्यां उपस्थित श्री आजोबा गणपतीची महाआरती करण्यात आले.



















