सोलापूर – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे व इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या आंतरशालेय निर्मल मॅरेथॉन स्पर्धेत येथील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले
स्वातंत्र्य सैनिक तुलसीदास दादा जाधव स्मारक येथून ही स्पर्धा संपन्न झाली. या सर्वांना प्रथम क्रमांकाचे 2001, द्वितीयचे 1501, तृतीय क्रमांकाचे 1001 रोख रक्कम व प्राविण्य प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यांना
क्रीडा विभाग प्रमुख मारुती घोडके, नितीनकुमार गोरे, क्रीडा मार्गदर्शक पुंडलिक कलखांबकर, प्रशांत राणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोहरपंत सपाटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे, जनरल सेक्रेटरी, प्रा महेश माने, शालेय समिती चेअरमन शिवदास चटके संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, उपमुख्याध्यापक श्रीपतराव जगदाळे, पर्यवेक्षकद्वय सुरेश जगताप किरण देशमुख प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले.
खेळाडूंची कामगिरी :
14 वर्ष मुले प्रथम – श्रीधर सिद्धाराम डोंगरीतोट , तृतीय-सनिल सूंकप्पा मर्गमकोळी. मुली:- प्रथम-जानवी निलेश हरिहर ,द्वितीय-श्रीदेवी कृष्णा कोंढूर.
17 वर्ष मुले : प्रथम- दीपक महेश इपोळे, तृतीय- विजयसिंग दीपकसिंग आंबेवाले ,चतुर्थ -भाग्योदय श्रीमंत नागलगाव. मुली : प्रथम-सृष्टी शरणप्पा हडपद, द्वितीय- पवित्र इरप्पा नागलगाव, तृतीय- अक्षता सन्मुखपा गंगोंडा, चौथा- सिरीन सैपन जमादार.
Post Views: 19