सोलापूर – ‘ लडाख मॅरेथॉन’ मध्ये कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी- मुंबई येथील सहाय्यक आयुक्त सोलापूरचे सुपुत्र सूर्यकांत श्रीमंत खटके यांची यशस्वी धाव झाली आहे.
टाटा मुंबई प्रोकैम मॅरेथॉन,टाटा अल्ट्रा मॅरेथॉन,लोणावळा वर्षा मैराथन ,माउंट अबू मैराथन ,खारघर हिल मैराथन व अनेक प्रतिष्ठेच्या मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग घेतलेले सूर्यकांत खटके यांनी लेह येथील अत्यंत कठीण ५०% ऑक्सीजन असलेल्या ‘ लडाख मॅरेथॉन’ मध्ये सहभागी होत ४२ किलोमीटरचे अंतर ५ तास ५७ मिनिट मध्ये पूर्ण केले आहे. या मुळे शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
नवी मुंबई कौशल्य विकास विभाग येथील अत्यंत महत्त्वाचा कारभार सांभाळताना आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातही सूर्यकांत खटके यांनी दररोज पहाटे लवकर उठून धावण्याचा सराव मागे पडू दिला नाही. यामुळे दैनंदिन कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. ध्येय, मेहनत व सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणेच आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वाची ठरणारी जिद्द या धावण्याच्या सरावातून त्यांनी मिळविली आहे. लडाख मॅरेथॉन मधील आणखी एका यशस्वी कामगिरीबद्दल सहाय्यक आयुक्त सूर्यकांत खटके यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
Post Views: 19