अक्कलकोट – अक्कलकोट शहर व परिसरात सोमवार तसेच मंगळवार सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली .बुडत्याला काठीचा आधार याप्रमाणे खरीप हंगाम पावसाअभावी पिके जळून गेली असताना रब्बी पेरणीसाठी तरी हा पाऊस पोषक ठरेल या आशेवर बळीराजाने अद्याप हिम्मत सोडली नाही .
पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आता सारी भिस्त रब्बीबी हंगामावर शेतकऱ्याची भिस्त आहे . सोमवार मंगळवार सलग दुसऱ्या दिवशी अक्कलकोट शहर परिसरात पावसाने हजेरी लावली . मंगळवारी दुपारी वरात्री७ .३०पासुन८ . र५पर्यत खंडाखंडाने पाऊस पडला . पाणीटंचाई दुर होण्यासाठी अद्याप मोठया पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे .