Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ चे फेरसर्वेक्षण करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्या!

तरुण भारतbyतरुण भारत
September 23, 2026
in west maharashtra
0
आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ चे फेरसर्वेक्षण करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्या!
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मोहोळ – तालुक्यातील सारोळे, खवणी, पोखरापूर, यावली, नजीक पिंपरी, आढेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचे तसेच पिण्याच्या पाण्याचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ या योजनेचे फेरसर्वेक्षण करून आवश्यक कामांची सुधारित आखणी, अंदाजपत्रक व  प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दि.२२ सप्टेंबर रोजी मंत्रालयात जलसंपदा मंत्री  ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
  यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य व मोहोळ पंचायत समितीचे भाजपा गटनेते संजीव खिलारे यांनी जलसंपदा मंत्री महोदयांना सविस्तर निवेदन सादर करून या भागातील सिंचनाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. निवेदनात म्हटल्या प्रमाणे, मोहोळ तालुक्यातील कायम दुष्काळप्रवण असलेल्या या भागामध्ये सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना दीर्घकाळापासून दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने आष्टी-पोखरापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ ही या भागासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
योजनेअंतर्गत उत्तरेकडील डावी वितरिका अंशतः पूर्ण झाली असून, तिची लांबी व सध्याची पाणि वितरण व्यवस्था लक्षात घेता अपेक्षित सिंचन क्षेत्राला पाणी उपलब्ध होण्यास मर्यादा निर्माण झाल्या आहेत. तसेच दक्षिणेकडील उजव्या वितरिकेचे आवश्यक काम पूर्ण झालेले नसल्याने मोठ्या प्रमाणातील लाभक्षेत्रातील शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित आहेत.
त्यामुळे योजनेची विद्यमान आखणी, झालेली व अपूर्ण कामे, संभाव्य लाभक्षेत्र, उपलब्ध जलस्रोत, भौगोलिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष सिंचनाची गरज यांचा सर्वंकष तांत्रिक फेरआढावा घेऊन नव्याने फेरसर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. या फेरसर्वेक्षणाच्या आधारे आवश्यक वितरिका व कालव्यांची सुधारित आखणी करून संबंधित कामांना सुधारित तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी तसेच आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.  शिष्टमंडळाने मांडलेल्या मागणीची जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी सकारात्मक दखल घेत सदर प्रश्नाबाबत त्यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या उचित सूचना दिल्या.
   या मागणीमुळे मोहोळ तालुक्यातील कायम दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळण्यास तसेच संबंधित गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. आष्टी-पोखरापूर योजनेतून पोखरापूर, खवणी व सारोळे या गावांना सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी यापूर्वीही पाठपुरावा झालेला असून या योजनेचा विषय अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहिला आहे.
   यावेळी भाजपाचे राज्य परिषद सदस्य व मोहोळ पंचायत समितीचे भाजपा गटनेते संजीव खिलारे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरुटे, सारोळेचे सरपंच शाहीर भाऊ सलगर, पोखरापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हर्षद दळवे, खवणी येथील भाजपा युवक कार्यकर्ते देविदास भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 23
Previous Post

श्री न.फू.शहा कोठारी हायस्कूलमध्ये गणेशोत्सवाचा महाप्रसादाने  समारोप

Next Post

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

ताज्या बातम्या

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर भालो युवा महासंघाचे आंदोलन स्थगित;१५ दिवसांत प्रश्न सोडविण्याची मागणी

September 24, 2026

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या बाल चिमुकल्यांकडून गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जना

September 24, 2026

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारीकार्यालय कार्यान्वित #viral #news #solapurnews

September 24, 2026

उजनीच्या पाण्याबद्दल हे बोलले मुख्यमंत्री #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

आता रुग्ण कुठेही घेऊ शकतात औषध बंधन नाही #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

अजित सृष्टी देखावा पाहून ढसाढसा रडले पार्थ पवार #marathinews #news #viral

September 24, 2026

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1251959

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!