सोलापूर- सेवा संकल्प अभियानांतर्गत महानगरपालिका व प्राथमिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका परिसरात घेण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत एस.व्ही.सी.एस. हायस्कूल एमआयडीसी ची विद्यार्थिनी श्रेया हिरोळी हिने प्रथम क्रमांक पटकाविली. महापालिकेच्या उपायुक्ता विना पवार,नगरसेविका रोहिणी तडवळकर, सुप्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांच्या हस्ते श्रेया हिरोळी हिला प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिरोळी हिला कलाशिक्षक पंडित स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक धनंजय नकाते, उपमुख्याध्यापक सुहास काटगांव व पर्यवेक्षक केदार पटणे यांनी अभिनंदन केले.