श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर येथे ISTE, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने AN विभागाच्या वतीने ‘AIINNOVISION-2K26’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्षाचा सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. या कार्यक्रमात पोस्टर प्रेझेंटेशन, वादविवाद आणि लोगो मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भाग्येश बी. देशमुख, प्राध्यापक व विभागप्रमुख, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर उपस्थित होते. यावेळी प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. नीता एस. आळंगे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये Artificial Intelligence, Social Media, Fault Detection, Smart Infrastructure, Renewable Energy आणि Traffic Management या विषयांवर विद्यार्थ्यांनी पोस्टर्स सादर केले. वादविवाद स्पर्धेत ‘AI vs Human Intelligence’, ‘AI: Boon or Threat’ आणि ‘AI in Education’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. तसेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींसाठी Artificial Intelligence and Machine Learning विभागासाठी Logo Making Competition आयोजित करण्यात आली.
प्रा. डॉ. नीता एस. आळंगे यांनी विविध स्पर्धांची माहिती व परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. भाग्येश बी. देशमुख यांनी पोस्टर, लोगो डिझाईन व वादविवादासारख्या सह-अभ्यासक्रमीय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये विकसित होतात, असे सांगितले. भविष्यात Solution Engineering महत्त्वाची असून, वास्तविक समस्या सोडविण्यासाठी विविध अभियांत्रिकी शाखांचे ज्ञान एकत्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षापासून छोटे प्रकल्प हाती घ्यावेत तसेच AI, ML, GenAI आणि Digital Twins यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेच्या निकालानुसार पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक अक्षरा पाटणखर (श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर), तर द्वितीय क्रमांक सारीका शिवगुंडे (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, सोलापूर) यांनी मिळवला. वादविवाद स्पर्धेत दीपिका सूद, नाझ पटेल, समृद्धी मेणकुदळे व रचना द्यावरकोंडा (श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर) यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर अनम सुभेदार, अस्मिता होटकर, श्रीनेश सामा व उज्वल पैठणकर (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, सोलापूर) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. लोगो मेकिंग स्पर्धेत रामेश्वरी देगावकर (श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर) यांनी प्रथम क्रमांक, तर अदिती गाडवे (श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धांच्या परीक्षणासाठी तज्ज्ञ परीक्षकांनी जबाबदारी पार पाडली. पोस्टर प्रेझेंटेशनचे परीक्षण प्रा. व्ही. व्ही. शिरशाड (असिस्टंट प्रोफेसर, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (AI & DS), SSWCOE, सोलापूर) आणि प्रा. डॉ. नीता एस. आळंगे (विभागप्रमुख, IT विभाग) यांनी, वादविवाद स्पर्धेचे परीक्षण श्रीमती लक्ष्मी एस. बिराजदार (लेक्चरर, ह्युमॅनिटी अँड सायन्स विभाग, ए. जी. पाटील पॉलिटेक्निक, सोलापूर) आणि प्रा. डॉ. श्रीशैल ए. मळेवाडी (विभागप्रमुख, ह्युमॅनिटी अँड सायन्स विभाग) यांनी, तर लोगो मेकिंग स्पर्धेचे परीक्षण प्रा. माने एन. के. (विभागप्रमुख, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग) आणि प्रा. मनियाल एस. पी. (विभागप्रमुख, सिव्हिल विभाग) यांनी केले.
या कार्यक्रमासाठी SGI Solutions, सोलापूरचे श्री. सिद्धेश्वर टेंगळे आणि Chatake Innoworks Pvt. Ltd., सोलापूरचे श्री. आकाश चटके यांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले. पारितोषिक वितरणासाठी अॅड. आर. एस. पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य प्रा. गजानन आर. धरणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. मंजुषा झिपरे यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच प्रथम वर्षाचे वर्गसमन्वयक व विविध विभागांचे वर्गसमन्वयक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























