अक्कलकोट – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व जनता सामाजिक संस्था यांच्या वतीने दहिटणे येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या . . या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रामुख्याने पाच विषय देण्यात आले होते. छोटा गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी मनोगत व भाषणे सादर केली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. छोटा गट व मोठा गट यामधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास अक्कलकोटचे डीवायएसपी राजेद्र टाकणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दहिटणे गावचे सरपंच नितीन मोरे, ज्ञानगंगा प्रशालेचे मुख्याध्यापक सुरवसे , , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार , जोजन , पवार , अरुण पोपसपट गुरुजी, चनवीर बोदले, दत्तां गजाकोस, अमोल सहशिक्षिका यास्मिन शेख माने, अमोल मोरे, उशिनी मुजावर, मधुकर मोरे ज्योतिबा रसनभैरे अमोघसिद्ध कलगुडगी, गुंडू कुंभार, धनाजी कांबळे ज्ञानेश्वर गरडे शांतनू पाटील सद्दाम नदाफ सिद्धू गुरुजी महादेव गुरुजी फुलचंद चव्हाण, बाळू सुतार, टाटा मोटर्सचे राठोड , शेख गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून बनसोडे यांनी जबाबदारी पार पाडली. विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या वक्तृत्वकलेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
Views: 71