सोलापूर : होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ याचे विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी पाच वाजता अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन सदिच्छा भेट दिली. यावेळी मंडळाचे संस्थापक नागेश ताकमोगे, नगरसेवक जयकुमार माने, प्रतिक ताकमोगे, विशाल ताकमोगे, श्याम कदम, प्रशांत लोंढे, राजू शेवगार, सतीश ताकमोगे , जितेंद्र पवार, संजय जाधव आदी उपस्थित होते.
आसरा चौकापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली कल्याण नगर डी मार्ट चौक, दावत चौक, भारती विद्यापीठ मार्गे विजापूर रोड या मार्गावरून मिरवणूक मार्गस्थ झाली.
होटगी रोड मध्यवर्ती महामंडळामध्ये 84 मंडळांनी सहभाग नोंदविला होता.
होडगी रोड मध्यवर्ती महामंडळाचे 500 युवकांचे लेझीम खेळाडू लेझीम या पारंपारिक वाद्यात लेझीम चे डाव सादर केले. महामंडळाच्या वतीने मिरवणुकीमध्ये हायड्रोलिक असलेली विठ्ठलाची 25 फुटी मूर्ती लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीमध्ये अनेक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.
Post Views: 9