सोलापूर – पुणे येथे जानेवारी 2027 मध्ये होवू घातलेल्या 100 व्या साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात 99 नांदी संमेलन करण्याची संकल्पना होती ती सत्यात उतरत आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये 5 वे नांदी संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उद्घाटक सिने अभिनेते योगेश सोमण यांनी केले. 5 व्या नांदी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रविंद्र गुर्जर, वामसी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक मदना केशव रेड्डी, जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी, श्रृतीश्री वडगबाळकर, कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूरच्या माती मध्ये भाषा अनुबंधाची वेगळी ओळख आहे. आणि सोलापूरकरांनी मराठीसह इतर भाषेच्या साहित्याला भरभरून दिले आहे. मी नवखा असताना साहित्य परिषदेचा अध्यक्ष होण्यामध्ये सोलापूरकरांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच 100 वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेत असताना सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होवून हे संमेलन यशस्वी करावे असेही योगेश सोमण यांनी सांगितले.
कवि संजीव व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फाऊंडेशन, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य आणि वामसी लॅब यांच्या संयुक्तविद्यमाने सोलापूरच्या लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये 5 वे नांदी संमेलन घेण्यात आले. प्रारंभी सकाळच्या सत्रात नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या फिरत्या पुस्तकालय या बसचे उदघाटन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या संमेलनाचे समन्वयक जितेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी नांदी संमेलनाच्या आयोजनामागील हेतु स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र गुर्जर यांनी सांगितले की अनुवादातून अनेक विचार स्पष्ट करता येतात तसेच सध्याच्या एआयच्या युगात एआय हे मानवानेच निर्माण केलेले आहे त्यामुळे एआयचे आव्हान आहे पण धोका नाही असे ते म्हणाले. माणसे जोडण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी भाषेचा योग्य वापर होतो. देहबोली, मातृभाषा, राज्य भाषा आणि राष्ट्रभाषा यासाठी घरातून योग्य संस्कार होणे गरजेचे आहेत असे आपल्या मनोगतामधून वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी यांनी सांगितले.
उदघाटनानंतर बहुभाषिक तसेच युवा कवी संमेलन पार पडले. यामध्ये हिंदीमधून डॉ. ममता बोल्ली, उर्दु मधून मीर अफजल,तेलगू मधून रेणुका बुधारम,कन्नड मधून दत्तात्रय इंगळे तर मराठी मधून राजेंद्र भोसले, मारूती कटकधोंड, कालीदास चवडेकर, सागर आचलकर, योजनगंधा जोशी, रेणुका महागांवकर, मुबारक शेख, शैल शिल्पा जाधव, डॉ. स्मिता पाटील मोहोळ,राम प्रभु माने, मदन जवळगेकर,सिकंदर मुजावर, बदीउज्मा बिराजदार, गोविंद काळे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. रामचंद्र धर्मसाले यांनी आपल्या कविता सादर केल्या. दुपारी 12 वाजता युवा कवी संमेलन झाले त्यामध्ये प्रथमेश कासार, सिध्दाराम बन्ने, जयमाला गायकवाड, गायश्री हुलगप्पा मेट्रे, जैद शेख, तेजस्वीनी केंद्रे, यश क्षिरसागर, साक्षी सुराणा, संस्कृती कांबळे, रसिका येळवटकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. शेरो- शायरी आणि कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दुपारी 3 वाजता ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांचा कार्यक्रम सूर काही राहिले हा बहारदार कार्यक्रम झाला. विविध भाव गीत, भक्तीगीत आणि चित्रपटातील गीत कलावंतानी सादर केले त्याला संगितप्रेमी रसिकांनी मोठी दाद दिली. या नांदी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सोलापूरमधील, सोलापूर, जुळे सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पश्चिम सोलापूर, मोहोळ या शाखांच्यावर असूनप्रा.डॉ.श्रृतीश्री वडगबाळकर,किशोर चंडक, प्रा.नरेंद्र काटीकर,पद्माकर कुलकर्णी, सायली जोशी, गिरीश दुनाखे,रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, शिवजी शिंदे, उज्वला साळुंखे, संतोष साळुंखे, श्रीकांत मोरे, अस्मिता गायकवाड, राजशेखर शिंदे, डॉ.स्मिता प्रमोद पाटील, सुधीर नाईकनवरे, जयेश आराध्ये हे सर्व पदाधिकारी आहेत तर संयोन समिती मध्ये गोविंद काळे, डॉ. रामचंद्र धर्मसाले, डॉ. नितीन आवताडे, वंदना कुलकर्णी, शोभा बोल्ली, अश्विनी चव्हाण, अविनाश कामतकर, भिमगोंडा पाटील, बदीउज्जमा बिराजदार, दत्तात्रय पाटील, प्रमोद कोरे, अनिल देवसाले, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर हे काम पाहणार आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदिका शोभा बोल्ली यांनी केले.
चौकट –
समेल्लनस्थळी मोबाईल व्यसनातून वाचनाकडे या शिर्षकाखालील विविध चित्र असलेले पोस्टरचे प्रदर्शन करण्यात आले होते. नांदी संमेलनाचे समन्वयक यशवंत बिराजदार यांच्या संकल्पनेतून हे चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.

















