Tuesday, November 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

100 व्या साहित्य संमेलनात कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने सहभागी व्हावे – योगेश सोमण

तरुण भारतbyतरुण भारत
September 26, 2026
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – पुणे येथे जानेवारी 2027 मध्ये होवू घातलेल्या 100 व्या साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रासह देश विदेशात 99 नांदी संमेलन करण्याची संकल्पना होती ती सत्यात उतरत आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूरमध्ये 5 वे नांदी संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उद्घाटक सिने अभिनेते योगेश सोमण यांनी केले. 5 व्या नांदी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक अनुवादक रविंद्र गुर्जर, वामसी लॅबचे व्यवस्थापकीय संचालक मदना केशव रेड्डी, जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी, श्रृतीश्री वडगबाळकर, कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूरच्या माती मध्ये भाषा अनुबंधाची वेगळी ओळख आहे. आणि सोलापूरकरांनी मराठीसह इतर भाषेच्या साहित्याला भरभरून दिले आहे. मी नवखा असताना साहित्य परिषदेचा अध्यक्ष होण्यामध्ये सोलापूरकरांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच 100 वे मराठी साहित्य संमेलन पुण्यात घेत असताना सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होवून हे संमेलन यशस्वी करावे असेही योगेश सोमण यांनी सांगितले.
कवि संजीव व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फाऊंडेशन, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य आणि वामसी लॅब यांच्या संयुक्तविद्यमाने सोलापूरच्या लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये 5 वे नांदी संमेलन घेण्यात आले. प्रारंभी सकाळच्या सत्रात नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या फिरत्या पुस्तकालय या बसचे उदघाटन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या संमेलनाचे समन्वयक जितेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी नांदी संमेलनाच्या आयोजनामागील हेतु स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र गुर्जर यांनी सांगितले की अनुवादातून अनेक विचार स्पष्ट करता येतात तसेच सध्याच्या एआयच्या युगात एआय हे मानवानेच निर्माण केलेले आहे त्यामुळे एआयचे आव्हान आहे पण धोका नाही असे ते म्हणाले. माणसे जोडण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी भाषेचा योग्य वापर होतो. देहबोली, मातृभाषा, राज्य भाषा आणि राष्ट्रभाषा यासाठी घरातून योग्य संस्कार होणे गरजेचे आहेत असे आपल्या मनोगतामधून वामसी लॅबचे मदना केशव रेड्डी यांनी सांगितले.
उदघाटनानंतर बहुभाषिक तसेच युवा कवी संमेलन पार पडले. यामध्ये हिंदीमधून डॉ. ममता बोल्ली, उर्दु मधून मीर अफजल,तेलगू मधून रेणुका बुधारम,कन्नड मधून दत्तात्रय इंगळे  तर मराठी मधून राजेंद्र भोसले, मारूती कटकधोंड, कालीदास चवडेकर, सागर आचलकर, योजनगंधा जोशी, रेणुका महागांवकर, मुबारक शेख, शैल शिल्पा जाधव, डॉ. स्मिता पाटील मोहोळ,राम प्रभु माने, मदन जवळगेकर,सिकंदर मुजावर, बदीउज्मा बिराजदार, गोविंद काळे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. रामचंद्र धर्मसाले यांनी आपल्या कविता सादर केल्या. दुपारी 12 वाजता युवा कवी संमेलन झाले त्यामध्ये प्रथमेश कासार, सिध्दाराम बन्ने, जयमाला गायकवाड, गायश्री हुलगप्पा मेट्रे, जैद शेख, तेजस्वीनी केंद्रे, यश क्षिरसागर, साक्षी सुराणा, संस्कृती कांबळे, रसिका येळवटकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. शेरो- शायरी आणि कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दुपारी 3 वाजता ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेल्या गीतांचा कार्यक्रम सूर काही राहिले हा बहारदार कार्यक्रम झाला. विविध भाव गीत, भक्तीगीत आणि चित्रपटातील गीत कलावंतानी सादर केले त्याला संगितप्रेमी रसिकांनी मोठी दाद दिली. या नांदी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सोलापूरमधील, सोलापूर, जुळे सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पश्‍चिम सोलापूर, मोहोळ या शाखांच्यावर असूनप्रा.डॉ.श्रृतीश्री वडगबाळकर,किशोर चंडक, प्रा.नरेंद्र काटीकर,पद्माकर कुलकर्णी, सायली जोशी, गिरीश दुनाखे,रेणुका महागांवकर, प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, शिवजी शिंदे, उज्वला साळुंखे, संतोष साळुंखे, श्रीकांत मोरे, अस्मिता गायकवाड, राजशेखर शिंदे, डॉ.स्मिता प्रमोद पाटील, सुधीर नाईकनवरे, जयेश आराध्ये हे सर्व पदाधिकारी आहेत तर संयोन समिती मध्ये गोविंद काळे, डॉ. रामचंद्र धर्मसाले, डॉ. नितीन आवताडे, वंदना कुलकर्णी, शोभा बोल्ली, अश्‍विनी चव्हाण, अविनाश कामतकर, भिमगोंडा पाटील, बदीउज्जमा बिराजदार, दत्तात्रय पाटील, प्रमोद कोरे, अनिल देवसाले, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर हे काम पाहणार आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदिका शोभा बोल्ली यांनी केले.

चौकट –
समेल्लनस्थळी मोबाईल व्यसनातून वाचनाकडे या शिर्षकाखालील विविध चित्र असलेले पोस्टरचे प्रदर्शन करण्यात आले होते. नांदी संमेलनाचे समन्वयक यशवंत बिराजदार यांच्या संकल्पनेतून हे चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.

Views: 101
Previous Post

२३ हजार २५७ किलो निर्माल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून संकलन

Next Post

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय ‘पेडेक्सिल’च्या कमिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पदी सोलापूरच्या अमित कुमार जैन यांची बिनविरोध निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय ‘पेडेक्सिल’च्या कमिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पदी सोलापूरच्या अमित कुमार जैन यांची बिनविरोध निवड

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय 'पेडेक्सिल'च्या कमिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पदी सोलापूरच्या अमित कुमार जैन यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

हुतात्मा स्मृती मंदिर विकास सहकारी बँक सोलापूर देगलूरकर महाराज

November 24, 2026

श्री सिद्धेश्वर मंदिर दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा!

November 24, 2026

हजारो दिव्यांनी उजळले श्रीराम मंदिर; दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा!

November 24, 2026
गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता 

गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता 

November 24, 2026
आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही – मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील 

आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही – मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील 

November 24, 2026
त्रिपुरारी पौर्णिमा १ लाख भाविकांनी घेतले दर्शन

त्रिपुरारी पौर्णिमा १ लाख भाविकांनी घेतले दर्शन

November 24, 2026
भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा संपन्न

भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा संपन्न

November 24, 2026

महामार्ग सुरक्षेत मोडनिंब पोलिसांचा ठसा; वाहतूक शिस्त सुरक्षित प्रवासाची दक्षता 

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1559715

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!