श्रीपूर – सद्य स्थितीत वाफेगांव (ता . माळशिरस ) येथे उजनी उजव्या कालव्याचे रुंदीकरण होत आहे यावर बांधण्यात येणारा जलसेतूचे बांधकाम मजबूत व्हावे अशा आशयाचे निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांना वाफेगाव येथिल क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवराम गायकवाड यांनी दिले आहे . वाफेगांव ते वाघोली या गावांना पूर्वीपासून निरा उजवा कॅनॉल गेलेला आहे . त्यानंतर या कॅनॉलला छेद (क्रॉस ) देत उजनी कॅनॉल गेलेला आहे . त्यवेळी या क्रॉसिंग वर जलसेतू ( पुल ) बांधण्यात आला होता . परंतु सध्या उजनी कॅनॉलचे रुंदी करणाचे काम चालू असून यावर बांधण्यात येणारा जलसेतू मजबूत असावा कारण सध्या हे पाणी पुढे वाघोली कडे जाते असले तरी भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत या उजनी कॅनॉलचे पाण्याची गरज लक्षात घेवून या कालव्याचे व त्यावर होणारा जलसेतू मजबूत असणे गरजेचे आहे . त्यासाठी संबधीत भिमा पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांना या बाबत सुचित करण्यात येवून नागरिकांचे मागणीचा सहानभूती पूर्वक विचार होऊन कार्यवाही व्हावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असे क्रांतीकारी संघटनेच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे .
Post Views: 7