सांगोला – यावर्षी सांगोला व पंढरपूर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज निर्माण झाली आहे. सांगोला मतदारसंघातील चिंचोली तलाव तसेच तिसंगी व सोनके येथील तलाव यांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असून सदर भागातील उभी पिके वाचविण्यासाठी तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता, नीरा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेले आवर्तन वेळेपूर्वी बंद न करता दि.१५ ऑक्टोबर पर्यंत सुरू ठेवण्याची व आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देण्यात यावेत अशी मागणी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. मुख्यमंत्री यांनी सदर मागणी गांभीर्याने ऐकून घेत याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
Post Views: 12