सोलापूर : नेते अण्णासाहेब भालशंकर यांनी आपल्या नातीचा वाढदिवस घरी किंवा हॉलमध्ये, नातेवाईक पाहुणेरावळे, मित्रमंडळी यांच्या सोबत साजरा करण्याऐवजी मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील मुलींच्या सोबत त्यांना स्वादिष्ट भोजन देऊन साजरा केला. अण्णासाहेब भालशंकर यांची इयत्ता तिसरीत सेंट थॉमस प्रशालेत शिकणारी नात कु. सांची मिलिंद भालशंकर हिचा वाढदिवस अतिशय साध्या सोप्या पद्धतीने साजरा केला. अक्कलकोट रोड सोलापूर येथील मातोश्री रुक्मिणी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींच्या सोबत केक कापून ,त्यांना स्वादिष्ट भोजन देऊन साजरा केला. वसतिगृहातील मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी त्यांनी या अनोख्या पद्धतीने आपल्या नातीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी वसतिगृहाच्या अधिक्षिका ज्योती चांदोडे , विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे आणि त्यांचे सर्व सहकारी ,तसेच राष्ट्रसंत शाळेतील सर्व शिक्षक, वसतिगृहातील सर्व मुली उपस्थित होते.अण्णासाहेब भालशंकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
—
Post Views: 9