सोलापूर : शहरातील कचरा संकलन, वाहतूकीचा मक्तेदार नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकारांना दिली.
पहिल्या मक्तेदाराची मुदत येत्या डिसेम्बर महिन्यात संपणार आहे. त्यापूर्वी नवा मक्तेदार नियुक्त करणे आवश्यक आहे म्हणून हा प्रस्ताव तातडीने पाठवला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवा मक्ता देताना काही गोष्टींची खबरदारी घेण्यात आली आहे, सोलापूर शहर कचरामुक्त झाले पाहिजे. संपूर्ण यंत्र सामुग्री मक्तेदाराची असेल. शिवाय दांडाची रक्कमही वाढवली आहे. महापालिकेच्या घंटागाड्या आहेत, परंतु त्यानेही पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे असेही आयुक्तांनी सांगितले. मक्तेदाराला देण्यात येणारे दर पूर्वीपेक्षा थोडे ज्यास्त आहेत. कारण कामगारांचा पगार १७००० रुपयावरून २४००० रुपये झाला आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रतिटन कचरा उचलून वाहतुकीचे दरही वाढले आहेत असेही आयुक्तांनी सांगितले.
पथदिव्यासाठी नवीन मक्ता
शहरातील पथ दिव्यासाठी नवा मक्तेदार शोधला आहे. ईईएक्सएल कंपनीची मुदत सप्टेंबर अखेर म्हणजे आज संपणार आहे. नवीन मक्तेदार नेमण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवला आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यावर यावर निर्णय होईल असे वाटते असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
—
Post Views: 9